Loksabha 2019 : जर्मनीहून खास मतदान करण्यासाठी देशपांडे दाम्पत्य पुण्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

पुणे : लोकशाहीचा उत्सव भारतातील लोकांप्रमाणे परदेशातील भारतीयही तितक्‍याच गांभीर्याने घेत आहेत. मतदानाचे महत्त्व लक्षात घेऊन जर्मनीमध्ये राहणारे भारतीय दाम्पत्यही भारतात खास मतदान करण्यासाठी आले आहेत. 

विजय देशपांडे आणि अश्‍विनी देशपांडे हे दाम्पत्य गेली चार वर्षे परदेशात स्थायिक आहेत. मतदानाचा हक्क बजवण्यासाठी खास भारतात आले आहेत. परदेशात जाण्याआधी पाच वर्षांपूर्वीही मतदान करूनच ते परदेशात गेले. ते दोघेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इंजिनिअर म्हणून काम करतात. भारतात राहत नसले तरीही देशात निवडून येणारे लोक प्रतिनिधी हे जबाबदार असावे. आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशाचे नाव जगामध्ये अधिकाधिक उंचीवर जावे या उद्देशाने त्यांनी भारतात येऊन मतदान केले. 

"आम्ही दरवर्षी डिसेंबरमध्ये भारतात येत असतो. परंतु निवडणुका जाहीर झाल्यापासूनच ठरवले की मतदानाला जायचे. मतदान हा आपला अधिकार आहे. त्यामुळे आपण कुठेही असलो तरी तो बजावणे आपले कर्तव्य आहे. मतदान केल्याशिवाय लोकप्रतिनिधींना बोलण्याचा अधिकार आपल्याला राहत नाही."
- अश्‍विनी देशपांडे

Web Title: The young Indian couple came from germany to vote in pune