टेम्पो मागे घेताना तरुणास धडक; उपचारादरम्यान मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

पुणे : टेम्पो पाठीमागे घेत असताना चालकाने अचानक वेग वाढविल्यामुळे दिशा दाखविणाऱ्या तरुणास जोरदार धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यु झाला. ही घटना पाच नोव्हेंबरला दुपारी साडेबारा वाजता कर्वेनगर येथील मातोश्री कॉलनीमधील रस्त्यावर घडली. 

पुणे : टेम्पो पाठीमागे घेत असताना चालकाने अचानक वेग वाढविल्यामुळे दिशा दाखविणाऱ्या तरुणास जोरदार धडक बसून गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पाच नोव्हेंबरला दुपारी साडेबारा वाजता कर्वेनगर येथील मातोश्री कॉलनीमधील रस्त्यावर घडली.

पुण्याचा महापौर तयारीचाच हवा!  

शेकाप्पा हिप्परीकर (वय 32, रा. वारजे, मूळ रा. कलबुर्गी, कर्नाटक ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालक चंद्रमप्पा कलप्पा कट्टमणी (वय 28 , रा. कोथरूड, मूळ रा. कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सावित्री हिप्परीकर (वय 25) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

#TransportIssue पुण्यातील अपघातांची संख्या घटली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेकाप्पा व चंद्रमप्पा हे दोघेही मुळचे कर्नाटकचे असून ते एकाच टेम्पोवर कामाला होते. पाच नोव्हेंबरला दोघेही एकाच टेम्पोतून कर्वेनगर परिसरामध्ये साहित्य भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेकाप्पाला पत्नीचा फोन आल्यामुळे त्यांनी खाली उतरुन चंद्रमप्पाला टेम्पो चालविण्यास सांगितले. ते पत्नीशी मोबाईलवर बोलत चंद्रमप्पाला टेम्पो मागे घेण्यास सांगत होते. त्यावेळी चंद्रमप्पाकडून अचानक टेम्पोचा वेग वाढल्यामुळे टेम्पो वेगाने मागे आले. त्यावेळी पाठीमागे असलेल्या शेकाप्पाला टेम्पोची जोरदार धडक बसली, त्यानंतर ते जवळच असलेल्या झाडाला धडकले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टारांनी घोषीत केले.

पुणेकरांनो, उद्यापासून वाहतूकीत होणार 'हे' बदल कारण... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The young man died due to tempo hit in pune