दौंड : दरवेळी भांडणे करतो म्हणून मित्रांनीच काढला काटा

दौंड : दरवेळी भांडणे करतो म्हणून मित्रांनीच काढला काटा

दौंड : मद्यपान केल्यानंतर दरवेळी भांडण करणार्या प्रशांत उर्फ हर्षद निंबाळकर (वय २४) या तरूणाचा काटा त्याच्याच मित्रांनी कायमचा काढल्याचे उघडकीस आले आहे. प्लॅस्टिक टेपने हात व पाय बांधून हर्षद निंबाळकर यास नदी पात्रात फेकून खून केल्याप्रकरणी त्याच्या दोन मित्रांना दौंड पोलिसांनी अटक केली आहे.

दौंडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी या बाबत माहिती दिली. प्रशांत उर्फ हर्षद लक्ष्मण निंबाळकर (वय २४, रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर ) याचा मित्रांनी खून केला होता. मजुरी किंवा वाहनांवर बदली चालक म्हणून काम करणारे हे चौघे मित्र १ मार्च रोजी पाटस (ता. दौंड) येथे मद्यपानासाठी एकत्र आले. मद्यपान केल्यानंतर हर्षद निंबाळकर दरवेळी भांडणे करतो या रागातून त्यास त्याचे मित्र मारूती निंबाळकर, सतीश भोसले व सागर दाभाडे यांनी बेदम मारहाण केली. हर्षद निंबाळकर अर्ध बेशुध्द अवस्थेत असताना त्याला पाटस येथून दुचाकीवर बसवून डिकसळ (ता. इंदापूर) येथे नेण्यात आले व पुलावरून त्याला भीमा नदी पात्रात फेकून दिले होते. ५ मार्च रोजी खानवटे (ता. दौंड) येथे नदी पात्रात त्याचा कुजलेला मृतदेह सापडल्याने दौंड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान हर्षद निंबाळकर याच्या नातेवाईकांनी यवत पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद उशिराने दिली. दौंड पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना ७ एप्रिल रोजी दौंड येथे बोलावून मृतदेहाचे छायाचित्र व अंगावरील कपडे दाखविले असता मयत व्यक्ती हर्षद असल्याचे स्पष्ट झाले. ओळख पटविण्यासारखी कोणतीही खूण नसताना पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी शोध कार्य व तांत्रिक विश्लेषण करीत सखोल तपास केला असता चौघे जण मद्यपानाच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर हर्षद याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संशयित आरोपी मनोज उर्फ मारूती प्रकाश निंबाळकर (वय २४, रा. गणेगाव दुमाला ) व सतीश काशिनाथ भोसले (वय ३३, रा. वरवंड, ता. दौंड) यांना अटक करण्यात आली. तर तिसरा संशयित आरोपी सागर नवनाथ दाभाडे (रा. गणेगाव दुमाला) हा फरार आहे. 

पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन पाटील,नारायण पवार यांच्यासह सहायक निरीक्षक ऋषीकेश अधिकारी, सहायक फौजदार दिलीप भाकरे, हवालदार आसिफ शेख, पांडुरंग थोरात, सचिन बोराडे, किरण राऊत, अण्णासाहेब देशमुख, अमोल गवळी, अमोल देवकाते, नारायण वलेकर, आदेश राऊत, रवी काळे, किरण ढुके यांनी तपास करून संशयितांना अटक केली.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com