दारू पाजून लुटण्याचा डाव तरुणाने उधळला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पिंपरी : तरुणास दारू पाजून त्यास लुटण्याचा डाव तरुणाने उधळून लावला. याप्रकरणी मोटार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन बबन कांबळे (वय 32, रा. शंकरनगर, धोबीघाट, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. समरसिंह श्रीनिवास रेड्डी (वय 17, रा. नारायणनगर, हिंजवडी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
उपनिरीक्षक भारत चपाईतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, समरसिंह यांना आपल्या मित्राला चिंचवडमध्ये भेटण्यासाठी यायचे असल्याने त्यांनी एक मोटार बुक केली. मात्र, ती मोटार येण्यापूर्वीच आरोपी कांबळे तिथे मोटार घेऊन आला. तुम्ही मोटार बुक केली आहे का? अशी विचारणा करीत समरसिंह यांना आपल्या मोटारीत बसविले. त्यानंतर शंकरनगर येथे नेऊन कांबळे याने समरसिंह यांना जबरदस्तीने दारू पाजली. समरसिंह यांच्या खिशातील 50 हजारांचा मोबाईल व तीन हजार रुपये रोख, असा ऐवज काढून घेतला. समरसिंह यांनी मोबाईल आरोपीकडे मागितला. मात्र, त्यांनी नंतर देतो, असे म्हणत मोबाईल देण्यास टाळाटाळ केली. यामुळे समरसिंह यांनी चालत्या मोटारीचा हॅंडब्रेक दाबून ती उभी करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरडाओरडा केला. यामुळे जमा झालेल्या नागरिकांनी कांबळे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चिखली पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. 
 
Web Title: young man spoiled by theft plan