esakal | पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide

पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. हि घटना 10 ऑगस्ट रोजी लोणी स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित सुनिल पवार (रा. माई हाईटस, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुनिल रघुनाथ पवार (वय 59 , रा. माई हाईटस, लोणी स्टेशन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसरमधील रामटेकडी येथे राहणाऱ्या 28 वर्षीय पत्नीसह सासुविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: सांगली : एलईडी प्रकल्पाबाबत स्मार्ट कंपनीची याचिका फेटाळली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितचा नोव्हेंबर 2016 मध्ये विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून पत्नी त्यास वेगळे राहण्यासाठी त्याच्याशी सातत्याने भांडणे काढत होती. तसेच बाहेर नोकरी करायची आहे आणि घरातील कोणाशी बोलायचे नासी, या कारणांवरुनही पत्नी, सासू यांच्याकडून त्यास सातत्याने शिवगीळ करून त्यास मानसिक त्रास दिला जात होता.

या त्रासाला कंटाळून रोहितने 10 ऑगस्ट रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रारंभी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती, फिर्यादी दाखल झाल्यानंतर पत्नी व सासुविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रोहितने आत्महत्येपुर्वी त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ केला होता. हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे.

loading image
go to top