दुचाकी बसखाली गेल्याने तरुण ठार;दुचाकीसह बसने पेट घेऊन खाक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 February 2021

चंदननगर-खराडी बाह्यवळण मार्गावर सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता ही घटना घडली. यात अजिंक्य येवले (वय २६) हा दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की अजिंक्यच्या डोक्यातील हेल्मेट फुटून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वारजे माळवाडी- वाघोली मार्गावरील ही बस वाघोलीकडे जात असताना हा अपघात झाला. बीआरटी मार्गातून जाणारा दुचाकीस्वार बसला ओव्हरटेक करत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बसला धडक झाली.

पुणे /रामवाडी : नगर रस्त्यावर बीआरटी मार्गात बसला ओव्हरटेक करताना दुचाकीची बसला धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात बसखाली अडकलेल्या दुचाकीने पेट घेतल्याने बसनेही पेट घेतला अन काही मिनिटांतच दोन्ही वाहने खाक झाली. बसचालकाने प्रसंगावधान राखत वेळीच सर्व प्रवाशांना खाली उतरविल्याने जीवितहानी झाली नाही.

चंदननगर-खराडी बाह्यवळण मार्गावर सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता ही घटना घडली. यात अजिंक्य येवले (वय २६) हा दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की अजिंक्यच्या डोक्यातील हेल्मेट फुटून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वारजे माळवाडी- वाघोली मार्गावरील ही बस वाघोलीकडे जात असताना हा अपघात झाला. बीआरटी मार्गातून जाणारा दुचाकीस्वार बसला ओव्हरटेक करत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बसला धडक झाली. त्यानंतर दुचाकी बसखाली गेली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार दूरवर फेकला गेल्याने डोक्यावरचे हेल्मेट फुटून त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. बसला आग लागल्याचे लक्षात आल्यावर प्रसंगावधान राखून चालकाने बसमधील २० प्रवाशांना खाली उतरवल्याने त्यांचे प्राण वाचले.

पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा

...म्हणून जळाली बस
अपघातानंतर सीएनजीवर धावणाऱ्या बसच्या खाली दुचाकी आली. त्यावेळी तिच्यातून पेट्रोल बाहेर आले. बसच्या कन्व्हर्टरला हादरा बसला. त्यामुळे त्यातून गॅस बाहेर येऊ लागला. बसचे इंजिन गरम होते. त्यातच पेट्रोल गॅसच्या संपर्कात आले. परिणामी गॅसने पेट घेतला आणि बस, दुचाकी काही मिनिटांतच जळून खाक झाली, असे पीएमपीच्या अपघात विभागाला दिसून आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The young man was killed when the two-wheeler went under the bus