Loksabha 2019 : तरुणांनो, मतदानाची अजूनही संधी

Loksabha 2019 : तरुणांनो, मतदानाची अजूनही संधी

पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नवीन मतदार नोंदणी अद्याप सुरू आहे. त्यासाठी आलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन अर्जांची छाननी करणे, मतदारयाद्या अद्ययावत करणे, मतदार ओळखपत्र तयार करणे, अशी कामे शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुरू आहेत. 

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी आपापल्या व सहयोगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठकी, मेळावे सुरू केले आहेत. मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला असल्याचे चित्र एकीकडे आहे. तर दुसरीकडे निवडणूक विभागाकडून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने नवमतदार नोंदणी सुरू आहे. ऑनलाइन अर्जांची तपासणी व ऑफलाइन अर्जांची छाननी सुरू आहे. काही मतदार नावात बदल, पत्त्यात बदल, नाव कमी करणे यासाठीही अर्ज करीत आहेत. एकट्या चिंचवड मतदारसंघातून २८ हजार १८० नवीन अर्ज आलेले आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मतदानासंबंधीची तयारी सुरू आहे. मतदारयाद्या अद्ययावत करणे, नव्याने नोंदणी झालेल्या नावांचा समावेश करून पुरवणी मतदारयाद्या तयार करणे, अर्जांची छाननी करून मतदान ओळखपत्र तयार करणे, तयार झालेल्या ओळखपत्रांचे मतदान केंद्र अधिकाऱ्यांमार्फत मतदारांपर्यंत पोचविणे अशी कामे सुरू आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकार पालन व्हावे, गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी तिन्ही विधानसभा मतदान क्षेत्रानुसार भरारी पथकांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्यामार्फत संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. मतदारयाद्या ऑनलाइन तपासणी, ऑफलाइन तपासणी, मतदार याद्या अद्ययावतीकरण, मतदान यंत्र (ईव्हीएम), मतदान पडताळणी यंत्र (व्हीव्हीपॅट), आचारसंहिता, टपाली मतदान असे वेगवेगळे कक्ष तिन्ही कार्यालयात सुरू केलेले आहेत. 

कामे शनिवारपर्यंत पूर्ण होणार
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक विषयक सर्व कामे शनिवारपर्यंत (ता. ३०) पूर्ण करायची आहेत. यामध्ये निवडणुकीसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदारयाद्या अद्ययावतीकरण, मतदान यंत्र, मतदान पडताळणी यंत्र यांची तपासणी करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वाटप करणे आदी कामांचा समावेश आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com