लोणीतील तरुणांनी वन्यप्राणी पक्षी झाडांसाठी केली पाण्याची सोय  

सुदाम बिडकर 
रविवार, 15 एप्रिल 2018

लोणी ता. आंबेगाव येथील राष्ट्रप्रेमी युवक मंडळाचे कार्यकर्त्यांनी वन्य प्राणी तसेच पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

पारगाव (पुणे) - लोणी ता. आंबेगाव येथील राष्ट्रप्रेमी युवक मंडळाचे कार्यकर्त्यांनी वडगावपीर येथील मुक्ताबाई मंदिर परिसरातील सामाजिक वनीकरनाच्या जमिनीमध्ये वनविभागाने लावलेल्या झाडांना कडक उन्हाळ्यात पाण्याची सोय केली आहे. तसेच वन्य प्राणी तसेच पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यांनी राबवलेल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या सर्वत्र कडक उन्हाळा जाणवत आहे. नैसर्गिक पाणी साठ्यातील पाणी आटून गेले आहे. वनविभागाने माळरानावर लावलेली झाडांची रोपे उन्हामुळे सुकू लागली आहेत पाण्याअभावी वन्य प्राणी तसेच पक्षांचे हाल होऊ लागले असल्याने लोणीतील राष्ट्रप्रेमी युवक मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत लोणी यांनी लोणी वडगावपीर रस्त्यावरील मुक्ताबाई मंदिर परिसरातील सामाजिक वनीकरनाच्या जमिनीमध्ये वनविभागाने लावलेल्या झाडांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची सोय केली आहे तसेच वन्य प्राण्यांना ही पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. प्लास्टिकचे रिकामे कॅन व बाटल्या कापून त्या झाडावर ठेऊन त्यामध्ये पक्षांसाठी पाणी ठेवले आहे. सरपंच सावळेराम नाईक, बाळासाहेब सुतार, संतोष रोकडे, प्रविण धुमाळ, राज क्षीरसागर, प्रकाश सिनलकर, प्रतिक कदम, कुमार जवणे, संकेत सिनलकर हे तरुण रोज पहाटे बरोबर पाणी घेऊन जाऊन झाडांना व छोट्या डबक्यात वन्य प्राण्यांना पाणी पिण्या तसेच पक्षांसाठी झाडावर ठेवलेल्या बाटल्यामध्ये पाणी टाकत आहे. या सर्व मित्रांनी परिसरातील इतर तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे.  
 

Web Title: The young people have the facilities made for wild birds