‘यिन’च्‍या निवडणुकीसाठी सरसावली तरुणाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

YIN

‘यिन’च्‍या निवडणुकीसाठी सरसावली तरुणाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : युवकांमधील सकारात्‍मक ऊर्जेला राष्‍ट्रनिर्मितीसाठी प्रोत्साहीत करणाऱ्या ‘सकाळ’ यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क अर्थात ‘यिन’च्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये उत्साह संचारला आहे. या निवडणुकीसाठी ३० नोव्‍हेंबर रोजी मतदान होत असून, त्‍याच्‍या तयारीला आता वेग आला आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया व मतदान ॲपवरून ऑनलाइन पद्धतीने पार पाडले जाणार आहे.

युवक-युवती हे राष्‍ट्राचे प्रमुख आधारस्‍तंभ असून, त्‍यांच्‍यात मोठी सकारात्‍मक ऊर्जा असते. या सकारात्‍मक ऊर्जेला समाजोपयोगी उपक्रमात सहभागी करून घेण्‍यासाठी ‘यिन’ची निर्मिती करण्‍यात आली आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींच्‍या निगडित असणाऱ्या ‘यिन’मुळे अनेक प्रश्‍‍न, समस्‍या चुटकीसरशी सुटल्‍या आहेत. युवकांमधील नेतृत्‍वगुण विकसित व्‍हावे, त्‍यांच्‍यातील नेतृत्‍वक्षमतेला वाव मिळावा, यासाठी ‘यिन’च्‍या माध्‍यमातून निवडणूक घेण्‍यात येते आहे.

निवडणूक कार्यक्रम

- अर्ज दाखल करणे : ११ ते २२ नोव्‍हेंबर

- उमेदवारांची यादी जाहीर करणे : २३ नोव्‍हेंबर

- प्रचार कालावधी (ऑनलाइन) : २३ ते २८ नोव्‍हेंबर

- मतदान : ३० नोव्‍हेंबर- निवडणुकीचा निकाल : २ डिसेंबर

अधिक माहितीसाठी : आकाश पांढरे, यिन अधिकारी, ९७६६७२५५९०

हेही वाचा: "मूठभर लोकं देशभक्त मुसलमानांना बदनाम करताय"

असा भरा उमेदवारी अर्ज

अर्ज भरण्‍यासाठी गुगल प्‍ले स्‍टोअरमधून ‘सकाळ माध्‍यम समूहा’चे Young Inspirators Network हे ॲप डाउनलोड करा.

‘‘युवकांमध्‍ये असणाऱ्या नेतृत्वगुणाला चालना देणारे ‘यिन’ हे सर्वांत प्रभावी माध्‍यम आहे. या माध्‍यमामुळे अनेक युवक आपापल्‍या भागाचे नेतृत्‍व करण्‍यासाठी पुढे येत आहेत. या युवकांना राज्‍यस्‍तरावर काम करण्‍यासाठीची संधी ‘यिन’ने निवडणुकीच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध करून दिली असून, त्‍यात सर्वांनी सहभागी होणे आवश्‍‍यक आहे.’’

- निनाद काळे, ‘यिन’ मेंटॉर

‘‘निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाहीचे मूल्य व नेतृत्व कौशल्य रुजवण्यासाठी यिन सातत्याने काम करत आहे. यिन मधून लाखों मुले घडली आहेत. तुम्हास हि घडण्याची हीच संधी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरून स्वतः साठी व इतरांसाठी नेतृत्व निर्माण करूया."

- अॅड. श्वेता यशवंत भोसले, यिन, निवडणुक अधिकारी.

loading image
go to top