फेसबुकवर अश्‍लील मेसेज पाठविणारा तरुण अटकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

पुणे : फेसबुकवर बनावट खाते उघडून एका नागरिकास अश्‍लील मेसेज पाठविणाऱ्यास सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. 

संदीप देवकर (वय 26, रा. मांगडेवाडी, कात्रज) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संजय सुखदेव जगताप (रा. धनकवडी) यांनी सायबर गुन्हे शाखेकडे फिर्याद दिली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप यांच्या फेसबुकवर सचिन देव या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. संबंधित व्यक्तीची कोणतीही पाहणी न करता जगताप यांनी ती स्वीकारली. दरम्यान, संबंधित व्यक्ती त्यांना अश्‍लील मेसेज पाठवू लागली. याबाबत जगताप यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिस निरीक्षक राधिका फडके, जयराम पायगुडे, पोलिस उपनिरीक्षक अनिता पवार, पूजा डहाळे व सोमनाथ भोरडे यांनी तपास सुरू केला. त्या वेळी देवकर याने सचिन देव या नावाने फेसबुकवर खाते उघडले असून, त्याच्याकडूनच हा प्रकार केला जात असल्याचे उघड झाले. त्यास अटक करून आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: Young sending obscene messages on Facebook

टॅग्स