Pune News : गडचिरोलीतील भाजप नगरसेविकेच्या मुलीची बावधनमध्ये आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Young software engineer Daughter of BJP office bearer  Gadchiroli commits suicide in Bavdhan

Pune News : गडचिरोलीतील भाजप नगरसेविकेच्या मुलीची बावधनमध्ये आत्महत्या

पिंपरी : सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बावधन येथे घडली. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. सायली वासुदेव बट्टे (वय २४, सध्या रा. बावधन, मूळ -झाशीनगर, गडचिरोली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सायली ही गडचिरोलीमधील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी वासुदेव बट्टे व वर्षा वासुदेव बट्टे यांची कन्या आहे.

सायली नोकरीच्या निमित्ताने काही महिन्यापासून पुण्यात राहत होती. सध्या ती एका कंपनीत नोकरीला होती. मात्र, वर्क फ्रॉम होम असल्याने ती रूमवरच असायची. सायलीचा भाऊ देखील काही दिवस पुण्यात राहत होता. तो नुकताच गडचिरोलीला परतला होता. दरम्यान, तिने राहत्या घरात स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर तिचे नातेवाईक पुण्यात आले. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरु आहे.