आपला साधा टीव्हीही लवकरच होणार स्मार्ट!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

पुण्यातील तीन विद्यार्थ्यांचे सरफेस टच तंत्रज्ञान
मुंबई - कोणताही टेलिव्हिजन किंवा स्क्रीन स्मार्ट करण्याचे "सरफेस टच' हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी तीन वर्षांच्या अभिनव प्रयोगातून तयार केले आहे. अवघ्या पाचशे रुपयांत ते लवकरच बाजारात येईल. आपल्या घरातला साधा टीव्ही आणि प्रोजेक्‍टरची स्क्रीनही याद्वारे स्मार्ट करणे शक्‍य होईल.

पुण्यातील लोहगाव येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील तीन विद्यार्थ्यांनी या मॉडेलसाठी तीन वर्षे मेहनत घेतली. इन्फ्रारेड तंत्रज्ञानावर आधारित सरफेस टचचे तंत्रज्ञान सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल. महाविद्यालये, शाळा, गेमिंग, तसेच व्हिडीओ कॉन्फरन्ससाठीही ते उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी सरफेस टच तंत्रज्ञानासाठी इन्फ्रारेडवर आधारित एक कॅमेराही विकसित केला आहे. एलडी इन्फ्रारेड पॉईंटरही त्यांनी तयार केला आहे. हा इन्फ्रारेड कॅमेरा आणि सरफेस टच सॉफ्टवेअरद्वारे कोणतीही स्क्रीन स्मार्ट करणे शक्‍य होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, एकाच वेळी 20 जणांना स्क्रीन वापरता येणे शक्‍य आहे. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग तसेच शालेय शिक्षणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त ठरेल.

डी. वाय. पाटील कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या किशोर उबाळे, किरण कुमार पांचाळ आणि करण शिंदे या तिघांनी या प्रकल्पासाठी तीन वर्षे मेहनत घेऊन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये सातत्याने सुधारणा केल्या आहेत. त्यामुळेच ते कमी खर्चात तयार झाले आहे. 200 मीटरवरूनही इन्फ्रारेडद्वारे स्क्रीनवर नियंत्रण ठेवता येते. इन्फ्रारेड कॅमेऱ्यासाठी वापरण्यात आलेली बॅटरी 30 दिवस वापरता येते.

कंपनी उत्पादनास तयार
कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमसाठी हे तंत्रज्ञान वापरता येते. याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची तयारी एका कंपनीने केली आहे. अवघ्या 12 केबी रॅमवर हे तंत्रज्ञान सहज वापरता येते.

Web Title: your smart TV will be soon!