बालिकेच्या विनयभंगप्रकरणी तरुणास अटक

संदीप घिसे 
शनिवार, 5 मे 2018

पिंपरी - घरासमोर खेळत असलेल्या दोन वर्षीय बालिकेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना रहाटणी फाटा येथे घडली.

भैय्यासाहेब महादेव फंदे (वय २१, रा. जगताप नगर, थेरगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत ३२ वर्षीय व्यक्तीने वाकड पोलfस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.४) दुपारी साडेतीन वर्षाच्या सुमारास फिर्यादी यांची दोन वर्षांची मुलगी खेळत होती. फिर्यादी यांच्या पत्नीचे लक्ष नसल्याचे पाहून आरोपीने दोन वर्षांच्या मुलीचा विनयभंग केला. सहायक पोलीस निरीक्षक विरेंद्र चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The youth arrested for the molestation of the girl