तरुणाचा तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

Crime
Crime

भोर - तहसील कार्यालयात दाखल असलेल्या जमिनीच्या कामकाजादरम्यान कोणत्याही नोटिशीशिवाय केस निकाली काढली आणि संबंधित कर्मचाऱ्याने विरोधी बाजूकडील लोकांकडून पैसे घेतले, या कारणावरून तरुणाने तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

समीर मारुती आवाळे (रा. वागजवाडी) असे तरुणाचे नाव असून, मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास निवासी नायब तहसीलदार मृदुला मोरे यांच्यासमोर त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आवाळे यांच्या वागजवाडीतील जमीन गट क्रमांक ४२८ मधील क्षेत्रदुरुस्तीसंदर्भात भोर तहसील कार्यालयात केस सुरू आहे. ‘‘तेथील कर्मचाऱ्याने तुमची केस अंतिम टप्प्यात आहे, असे सांगितले आणि विरुद्ध बाजूच्या तक्रारदाराकडून पैसे घेतले. आम्हाला नोटीस न देता केस निकाली कशी काढली,’’ असा प्रश्‍न करीत संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी समीर आवाळे यांनी केली. या संदर्भात सोमवारी (ता. २५) ते तहसीलदार अजित पाटील व प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना भेटले.

मंगळवारी सकाळी पुन्हा तहसील कार्यालयात आले. तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालयात नसताना त्यांनी निवासी नायब तहसीलदार मृदुला मोरे यांच्यासमोर गोंधळ घालून अंगावर रॉकेल ओतून घेतले. काडेपेटी हातात घेऊन काडी ओढण्याच्या तयारीत असतानाच कार्यालयातील कर्मचारी व उपस्थित नागरिकांनी त्यांना पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. निवासी नायब तहसीलदार मोरे, प्रांताधिकारी कार्यालयातील अधीक्षक मनोहर पाटील, समीर मुलाणी व उपस्थित पत्रकारांनी आवाळे यांना शांत करून समजूत काढली. तोपर्यंत पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांना ताब्यात घेतले. 

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत समीर आवाळे यांच्याविरोधात आत्महत्या करणे व शासकीय कामात अडथळा आणणे, याबाबत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com