पुणे : वाकडमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण

संदीप घिसे 
मंगळवार, 1 मे 2018

पिंपरी : नियमाची पायमल्ली करणाऱ्यास पावती फाडायला सांगितल्याच्या कारणावरून एका तरुणाने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात मारली. ही घटना वाकड येथे घडली.

पिंपरी : नियमाची पायमल्ली करणाऱ्यास पावती फाडायला सांगितल्याच्या कारणावरून एका तरुणाने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात मारली. ही घटना वाकड येथे घडली.

सुरज गोविंद परळकर (वय २८, रा. सायकर वस्ती, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. हिंजवडी वाहतूक विभागातील सहाय्यक पोलीस फौजदार भालेराव यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेराव हे रविवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास वाकडमध्ये कर्तव्यावर होते. त्यावेळी विना हेल्मेट आलेल्या परळकर याला पावती करण्यास सांगितले. या कारणावरून चिडलेल्या परळकर याने पोलिसाला शिवीगाळ करत हाताने कानशिलात मारली. तसेच धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: youth beaten traffic police in wakad pune

टॅग्स