सेल्फी घेऊन तरुणाची निगडीमध्ये आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पिंपरी - आत्महत्येपूर्वी फास असलेला सेल्फी काढून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निगडी येथे रविवारी (ता. 8) पहाटे घडली. 

पिंपरी - आत्महत्येपूर्वी फास असलेला सेल्फी काढून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निगडी येथे रविवारी (ता. 8) पहाटे घडली. 

विनोद रमेश गोसावी (वय 19, रा. रुपीनगर, तळवडे) असे तरुणाचे नाव आहे. निगडी ठाण्याचे हवालदार आनंद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि त्याचा चुलत भाऊ हे एकाच कंपनीत कामाला होते. कंपनीत फोनला परवानगी नसल्याने त्यांच्या भावाने फोन घरीच ठेवला होता. भावाला डबल ड्यूटी असल्याने तो कंपनीतच थांबला, तर विनोद शनिवारी दुपारी घरी आला. रात्री बारा वाजता कामावरून आल्यानंतर विनोदच्या भावाने दरवाजा वाजविला, मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर दरवाजा तोडला. तेव्हा आतमध्ये विनोदने गळफास घेतल्याचे दिसून आले. 

मूळचा शहादा-नंदुरबारच्या असलेल्या विनोदने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीही लिहून ठेवली होती. जीवनाचा कंटाळा आल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्याने चिठ्ठीत म्हटले आहे. चादरीची कड कापून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती करण्यापूर्वी गळ्यात फास असलेल्या अवस्थेतील सेल्फीही भावाच्या फोनमध्ये काढला होता. मात्र, तो त्याने सोशल मीडियावर अपलोड केलेला नाही. 

Web Title: Youth commits suicide with selfie