युवक काँग्रेस कात टाकणार; पुन्हा संघटन बांधणीचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता, त्यावर आत्मपरिक्षण करून पुन्हा जोमाने कामास लागण्याचा निश्चय युवक काँग्रेसने केला होता. त्यानुसार युवक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करण्याऱ्या तरुणांना काँग्रेसकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले.

पुणे : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशामध्ये युवक काँग्रेसचा मोठा हातभार लागला असून पक्षाला आणखी बळकट करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता, त्यावर आत्मपरिक्षण करून पुन्हा जोमाने कामास लागण्याचा निश्चय युवक काँग्रेसने केला होता. त्यानुसार युवक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करण्याऱ्या तरुणांना काँग्रेसकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले. Satyajeet Tambe        
प्रदेश युवक काँग्रेसच्या मुंबईत ११ व १२ नोव्हेंबरला युवक-युवतींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा निश्चय केला. याबाबतची माहिती तांबे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. "सरकार येतात...जातात... संघटना मोठी झाली पाहीजे ... पक्ष वाढला पाहीजे !! त्यासाठी आमचं काम सुरु झालंय... " असे त्यांनी ट्विट केले आहे. 

Satyajeet Thambe


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Congress made the decision to rebuild the organization