द्रुतगतीवर टेंपोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर देवळे गावाजवळ पंक्‍चर काढण्यासाठी मदत करणाऱ्या तरुणाचा टेंपोच्या धडकेत मृत्यू झाला. 

अनिल रंगनाथ मंगसुळे (वय ४०, रा. देवराष्ट्रे, केडगाव, जि. सांगली) असे मृत तरुणाचे नाव असून, सोमवारी (ता. २८) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

अनिल खासगी इनोव्हा कारने (एमएच-०१ व्हीए २८६) पुण्याहून मुंबईला जात होता. देवळे गावाच्या हद्दीत त्यांची मोटार पंक्‍चर झाली असता मोबाईलच्या प्रकाशात पंक्‍चर काढण्यासाठी तो चालकास मदत करत होता. या वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या टेंपोने (एमएच १२ जेएफ ०३१८) अनिल यांना ठोकरले. यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी टेंपोचालक सतीश नामदेव झरे (वय ३३, रा. नऱ्हेगाव, मुखेड, नांदेड) याला ताब्यात घेतले. 

Web Title: youth dead in accident Pune-Mumbai Expressway

टॅग्स