पुणे विद्यापीठात 23 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

ऋषिकेश आहेर (घारगाव, ता. संगमनेर जि. अहमदनगर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. वाणिज्य विभागात दुसऱ्या सत्रात तो शिकत होता. आजच त्याचा दुसऱ्या सत्रातील पहिला पेपर होता.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला आज (सोमवारी) सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

ऋषिकेश आहेर (घारगाव, ता. संगमनेर जि. अहमदनगर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. वाणिज्य विभागात दुसऱ्या सत्रात तो शिकत होता. आजच त्याचा दुसऱ्या सत्रातील पहिला पेपर होता.

वसतिगृहात नंबर 4 रुम नंबर 16 मध्ये तो राहायला होता. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला अचानक त्रास होऊ लागला. तो ओरडायला लागल्याने शेजारील इतर विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे धाव घेत सुरक्षा रक्षकांना बोलावून घेतले. यानंतर त्याला विद्यापीठातील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तो जास्त सिरीयस असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला ससूनला हलवण्यास सांगितले. ससूनला घेऊन गेल्यानंतर तिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

Web Title: youth dead of heart attack in Savitribai Phule Pune University