‘पीएमपी’च्या धडकेत युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

येरवडा - बंडगार्डन रस्त्यावरील सेंट्रल मॉल समोर दुचाकीला ‘पीएमपी’ची धडक बसून झालेल्या अपघात शहाबाज इसाक बागवान (वय 28,रा. चंदननगर भाजी मंडई जवळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेले शहाबाजचे वडिल इसाक बागवान गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनस सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘ शहाबाज व त्याचे वडिल दुचाकीवरून घरी निघाले होते. याचवेळी पीएमपीची दुचाकीला धडक बसल्याने अपघात झाला. यामध्ये पीएमपीच्या मागील चाकाखाली शहाबाज आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. इसाक गंभीर जखमी झाले. घटनेनंतर बराच वेळ शहाबाज यांचा मृतदेह जागेवरच पडून असल्याने जमलेल्या प्रक्षुब्ध जमावाने रस्त्याच्या दानेही बाजुला ये -जा करणाऱ्या बस व एसटीवर तुफान दगडफेक केली . यामध्ये आठ पीएमची व चार एसटी बसचे नुकसान झाले. त्यानंतर पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केले. रात्री उशीरा पर्यंत जमाव असल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वाडिया महाविद्यालय ते बंडगार्डन पर्यंतचा रस्ता पोलिसांनी वाहतूकीसाठी पूर्णत: बंद ठेवला होता. पोलिसांनी रात्री उशीरा वाहतूक पूर्वत केली.

Web Title: Youth death in PMP bus accident