डंपरखाली आल्याने धानोरीत तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

धानोरीमध्ये कुस्ती आखाडा मैदानाजवळ डंपरखाली येऊन तरुणाचा मृत्यू झाला. तोषवार मनजित सिंग (वय 34, रा. लक्ष्मी सत्यम सोसायटी, धानोरी) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास डंपर आणि दुचाकीचालक सिंग एकाच दिशेने विश्रांतवाडीकडे येत होते.

विश्रांतवाडी : धानोरीमध्ये कुस्ती आखाडा मैदानाजवळ डंपरखाली येऊन तरुणाचा मृत्यू झाला. तोषवार मनजित सिंग (वय 34, रा. लक्ष्मी सत्यम सोसायटी, धानोरी) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास डंपर आणि दुचाकीचालक सिंग एकाच दिशेने विश्रांतवाडीकडे येत होते.

सिंग हा डंपरला ओलांडून पुढे जात असताना रस्त्यात असलेल्या गायीला धडकला. त्यामुळे तो रस्त्यावर पडला. मागून येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सेनापती रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमध्ये तो कामाला होता. या प्रकरणी पोलिस अधिकारी वासुदेव बळिराम खाडे यांनी अज्ञात डंपरचालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. 

Web Title: A youth Died after Dumper Accident