पुणे : अपघातानंतर ओढ्यात पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 29 जुलै 2019

शुभम प्रकाश गायकवाड (वय 19, रा. कामना वसाहत कर्वेनगर) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. ओम कंधारे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अशी माहिती हवेली ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली. 

पुणे : खानापूर परिसरात दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकून ती दुचाकी थेट पूर आलेल्या ओढ्यात पडल्याने चालकाचा बुडून मृत्यू झाला आहे. तर मागे बसलेल्या युवक गंभीर जखमी झाला आहे. 

शुभम प्रकाश गायकवाड (वय 19, रा. कामना वसाहत कर्वेनगर) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. ओम कंधारे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अशी माहिती हवेली ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली. 

शुभम, ओम यांच्यासह पाच जण दोन दुचाकीहून खानापूर परिसरातील एका फार्म हाऊसवर पार्टी करण्यासाठी आले होते. त्यांनी येथे दारू पिऊन जेवण केले होते. साडे अकरा वाजता ते परत येण्यास निघाले. परत जाताना खानापूरच्या अलीकडे ओढ्यावर पूल आहे. त्या पुलाच्या कठड्याला त्यांची दुचाकी धडकली. शुभम गाडीसह ओढ्यात पडला. तसाच वाहत गेल्याने त्याचा बुडुन मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेला ओम मात्र दुचाकी धडकल्याने तो जखमी होऊन रस्त्यालगत पडला. 

अपघातानंतर तो वाहत्या पाण्यात बेपत्ता झाल्याने त्याच्या इतर तीन मित्रांनी स्थानिक नागरिक, हवेली पोलीस व पीएमआरडीएचे अग्निशामक यांना शनिवारी मध्यरात्री बोलविले. त्यांनी येऊन त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. काहीच सापडले नाही. जखमी कंधारेला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.  शुभम गाडीसह ओढ्यातील वाहणाऱ्या पाण्यात पडला आणि तो वाहत ओढ्यापासुन साधारण 500- 600मीटर अंतरावर धबधबा आहे. त्यामध्ये अडकला होता. पाठीमागून येणाऱ्या मित्राने रात्रीच शुभमचा शोध घेतला होता पण अधांर आणि पाऊस मुळे तो सापडला नाही

कर्वेनगर मधील मोरया मित्र मंडळ आणि अग्निशमन दल यांनी आज रविवारी सकाळी परत शोधमोहीम राबवत शोधकार्य सुरू केले त्यावेळी खानापूर ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे रस्तापासुन 500 मीटर अंतरावर एका धबधबा जवळ शुभमचा मृतदेह ग्रामस्थांना आढळला मृतदेह पाण्याबाहेर काढला. शवविच्छेदनसाठी ससुनला पाठविला. शुभमच्या मागे आई वडील एक भाऊ असा परिवार आहे. कर्वेनगर मधील मोरया मित्र मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth drown after accident in Pune