खडकवासला धरणात पंधरा वर्षांच्या युवकाचा बुडून मृत्यू 

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पार्थ जितेंद्र मात्रा (वय15, रा. राजस्थान निरांगा) असे त्या युवकाचे नाव आहे. राखी पौर्णिमेनिमित्त तो आपल्या आई वडिलांच्या समवेत पुण्यात विश्रांतवाडी येथे नातेवाईक यांच्याकडे आला होता.  

पुणे : खडकवासला धरणात बुधवारी सायंकाळी पंधरा वर्षाचा युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

पार्थ जितेंद्र मात्रा (वय15, रा. राजस्थान निरांगा) असे त्या युवकाचे नाव आहे. राखी पौर्णिमेनिमित्त तो आपल्या आई वडिलांच्या समवेत पुण्यात विश्रांतवाडी येथे नातेवाईक यांच्याकडे आला होता.  

खडकवासला धरण परिसरात तो दुपारी आई-वडील आणि नातेवाईक यांच्या समवेत आला होता. यावेळी धरणाच्या पाण्यात 100 टक्के पाणीसाठा झाला असल्यामुळे धरण काठोकाठ भरलेले आहे.  धरणाच्या कडेने चालत असताना त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. स्थानिक नागरिकांनी यावेळी पोलिसांना दिली. त्यानंतर पीएमआरडीए, पुणे महापालिकेचे सिंहगड रस्ता येथील अग्निशामक दलाचे जवानांनी शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. अंधार झाल्यामुळे शोध कार्य थांबवले जाऊद्या शोधकार्य सुरू होणार आहे अशी माहिती पोलिस पाटील ऋषिकेश मते यांनी पत्रकारांना दिली. 

Web Title: youth drown in Khadakwasla dam Pune