झारगडवाडीत विहिरीत बुडून युवकांचा दुर्दैवी मृत्यू

विहीरीतील कपारीला धडकल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती
Prashant Ghale
Prashant GhaleSakal

डोर्लेवाडी - विहीरीवर पोहण्यासाठी गेलेल्या बत्तीस वर्षीय युवकाचा डोक्यावर पाण्यात घेतलेल्या उडीने जीव घेतला. ही घटना झारगडवाडी ( ता. बारामती) येथे आज ( ता. २१ ) शनिवारी दुपारी साडे बाराच्या दरम्यान घडली. प्रशांत रामभाऊ घाळे असे या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहितीअशी, प्रशांत घाळे हा युवक आपल्या लहान भाच्यांना घेवून आज दुपारी बाराच्या दरम्यान, झारगडवाडी गावालगत असलेल्या खाजगी विहीरीवर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी प्रशांतने कपडे काढून विहीरीत सुळकी मारली. आणि तो थेट विहीरीतील कपारीला धडकला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये तो बराच वेळ विहीरीच्या पाण्यातून बाहेर आला नाही. मग यावेळी विहीरीवर बसलेल्या भाच्यांनी आरडाओरडा करत घर गाठले व घरातील कुटुंबियांना घटनेचे माहिती दिली.

कालच प्रशांत घाळे याच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्याने घरी अनेक पाहुणे मंडळी मुक्कामी होते. घटनेनंतर घरातील व नातेवाईकांनी विहीरीवर जावून गावकऱ्यांच्या मदतीने प्रशांतला विहीरी बाहेर काढले. त्यांच्या कपाळाला गंभीर जखम झाल्याचे दिसून आले. त्याला रुग्णवाहिके मधून खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, सहा वर्षांची मुलगी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक तपास बारामती तालुका पोलिस करीत आहेत..

दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे..

उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्याने अनेक जण पोहण्यासाठी विहिरीवर, तलावात, धरणात, नदीवर जात असतात. दोनच दिवसांपूर्वी भाटघर धरणात पोहण्यासाठी पाच महिला गेल्या होत्या या पाचही महिलांचा बुडून मृत्यू झाला आणि आज बारामतीतील युवकाचा मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी गेल्यानंतर अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. असे आव्हान बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी नागरिकांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com