तळजाई जलतरण तलावात युवकाचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पुणे - मित्रांसमवेत जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. तळजाई टेकडीवरील पुणे महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये हा प्रकार घडला. प्रफुल्ल भीमराव वानखेडे (वय 21, रा. म्हात्रे पूल, दत्तवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रफुल्ल त्याच्या मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला होता. तलावामध्ये मध्यभागी आला असता तो बुडाला. त्यानंतर त्याला बाहेर काढून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. पंचनामा केला असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. जलतरण तलावामध्ये कामावर हजर असलेल्या एका जीवरक्षकाची चौकशी सुरू आहे. शव विच्छेदनासाठी रात्री उशिरा ससून रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहकारनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली. 

प्रफुल्ल बारावीच्या पुनर्परीक्षेसाठी अभ्यास करीत होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्याची आई धुणीभांडी करीत असून, मोठा भाऊ इलेक्‍ट्रिशियन म्हणून काम करतो. दरम्यान, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे प्रफुल्लचा जीव गेल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला. घटनास्थळी संबंधित ठेकेदार आला असता त्याला संतप्त जमावाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. 

Web Title: youth drowned in Taljai Swimming Pool