Sat, Sept 23, 2023

Pune Crime: धक्कादायक! पुण्यात चोरट्यांना विरोध केल्यामुळे तरुणावर कोयत्याने वार
Published on : 4 June 2023, 7:48 pm
पुणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना विरोध केल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना कात्रज बसस्थानकाजवळ घडली.
या प्रकरणी सचिन तळवार (वय ३१, रा. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन हे कात्रज बसस्थानकापासून काही अंतरावर चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवले. चोरट्यांनी तरुणाच्या खिशातून साडेचार हजार काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर चोरट्यांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.