कुत्र्यापासून सुटका करुन तरुणांनी मोराला जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

-केसनंद येथील कुत्रे मागे लागलेल्या एका मोराला तेथील तरुणांनी जीवनदान दिले. - वनविभागाकडे सुपूर्त करण्यात आले.

वाघोली : केसनंद येथील जोगेश्वरी सनसिटी जवळील डोंगरालगत कुत्रे मागे लागलेल्या एका मोराला तेथील तरुणांनी जीवनदान दिले. त्यानंतर त्याला वनविभागाकडे सुपूर्त करण्यात आले.

काही तरुण डोंगराजवळ कामानिमित्त गेले होते. त्यावेळी काही कुत्रे एका मोराच्या मागे लागल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी कुत्र्यांना हाकलले. मात्र या प्रकारात मोर जखमी झाला. त्यांनी त्याला उचलून सनसिटीच्या कार्यालयात आणले. तेथे पाणी पाजले. यानंतर त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे कर्मचारी शिवले तेथे आले. त्या तरुणांनी मोराला त्यांच्या ताब्यात दिले.

पिंटू सरडे, निलेश धुमाळ, बंटी भोसले, धनाजी बांगर, अजिंक्य गोरे, भाऊसाहेब शिंदे, उदय पाटील या तरुणांनी मोराला वाचविले. मोरावर कात्रज येथील प्राणी संग्रहालयात उपचार करून निसर्गात सोडून देणार असल्याचे वनविभागाचे वायकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth give life to peacocks by rescuing them from dogs