तरूणांकडून "जागते रहो" अभियानातुन पोलिसांना मदत

रमेश मोरे
शुक्रवार, 18 मे 2018

जुनी सांगवी (पुणे) : दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टया सुरू झाल्या की शहरामध्ये घरफोड्या आणि चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होते. अशा चोऱ्यांचा वाढता आलेख रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागते रहो उपक्रम राबविला जातो.

जुनी सांगवी (पुणे) : दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टया सुरू झाल्या की शहरामध्ये घरफोड्या आणि चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होते. अशा चोऱ्यांचा वाढता आलेख रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागते रहो उपक्रम राबविला जातो.

ओम साई फाऊंडेशनच्या वतीने गेली अठरा वर्षां पासून पिंपळे गुरव, नवी सांगवी, जूनी सांगवीत नागरी सुरक्षेकरिता रात्रगस्तीच्या माध्यमातून पोलिसांसोबत काम केले जाते. फाऊंडेशनच्या सहभागी कार्यकर्त्यांकडून रात्री अकरा ते व पहाटे पाच पर्यंत शहराच्या प्रमुख भागांमधुन पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत गस्तीसाठी मदत केली जाते. बुधवारी (ता.16) उपक्रमावेळेस सहा पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे,पोलिस शिपाई विनायक डोळस, पोलीस शिपाई अण्णा जाधव, पोलीस शिपाई देवकर, पोलीस शिपाई देविदास गावित, पोलीस शिपाई बनसोडे, ओम साई फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे,संपर्क प्रमुख तौफिक सय्यद,निलेश मातणे, अमित कानडे,प्रसाद जंगम,राहुल कचरे, निलेश भोसले,स्वप्रिल जाधव,सुनिल मराठे,शंभु जाधव यांनी सहभाग घेत साई चौकातुन  जागते रहो गस्तीस सुरूवात केली. फेमस चौक,क्रांती चौक,कवडे नगर चौक,मयूरीनगरी चौक,गजानन नगर चौक,गार्डन चौक,पिंपळे गुरव बस स्टॅप चौक,शिवाजी चौक,रामकृष्ण मंगल कार्यालय चौक,एम एस काटे चौक,माकन चौक, शितोळे नगर चौक,दत्तआश्रम परिसर जुनी सांगवी, मुळा नदी किनारा भाग,व इतर ठिकाणी गस्त  घालण्यात आली. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे व पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा  हा उपक्रम १५ जून पर्यंत सुरू राहणार आहे. सदरच्या उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना  ओळखपत्र,टी - शर्ट,शिट्टी व काठी  असे साहित्य पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे.याच बरोबर "आपला शेजारी खरा पहारेकरी" हा उपक्रम राबविण्यात येत आहे.परिसरातील नागरिकही या उपक्रमाचे  स्वागत करीत आहेत तसेच स्वतः सहभागी होत आहेत.

Web Title: youth help to police with jagate raho program