‘यूथ आयकॉन’ चेतन भगत रविवारी येणार भेटीला

Chetan-Bhagat
Chetan-Bhagat

पिंपरी - ‘फाइव्ह पॉइंट समवन’, ‘वन नाइट ॲट द कॉल सेंटर’, ‘थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाइफ’ अशा प्रचंड खपाच्या पुस्तकांचे युवा लेखक चेतन भगत ‘सकाळ विद्या-एज्युकेशन एक्‍स्पो’निमित्त प्रथमच पिंपरी-चिंचवडकरांच्या भेटीला येत आहेत. दोन जून रोजी शिक्षण व करिअरविषयक जागरूक असणाऱ्या युवा वर्गाशी ते संवाद साधतील. चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टरमध्ये सकाळी अकरा वाजता या संवाद कार्यक्रमासाठी मुक्त प्रवेश आहे; मात्र संभाव्य गर्दी लक्षात घेवून www.vidyaseminars.com या वेबसाइटवर नावनोंदणी आवश्‍यक आहे.

नवी दिल्ली ‘आयआयटी’चे ते अभियांत्रिकी पदवीधर आहेत; तसेच भारतीय व्यवस्थापन संस्थेत (अहमदाबाद) पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. त्या वेळी ‘सर्वोत्कृष्ट नवोदित विद्यार्थी’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. दशकभर हाँगकाँग गोल्डमन सत्यसेवेच्या इन्व्हेस्टमेंट बॅंकर पदावर ते काम करीत होते. दरम्यानच्या काळात ते लेखनाकडे वळले. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या भगत यांची ‘फाइव्ह पॉइंट समवन’ ही पहिलीच कादंबरी प्रचंड गाजली. पुढे याच कादंबरीवर ‘थ्री इडियट्‌स’ हिंदी चित्रपट निर्माण झाला.

कॉल सेंटरवर आधारित ‘वन नाइट ॲट द कॉल’ ही त्यांची दुसरी कादंबरी. थ्री मिस्टेक्‍स ऑफ माय लाइफ, स्टेट्‌स, रिव्हॉल्युशन, टू स्टेट्‌स, हाफ गर्लफ्रेंड, व्हॉट यंग इंडिया वाँटस्‌ या कादंबऱ्याही तितक्‍याच वाचकप्रिय ठरल्या आहेत.  
राजकारण, समाजकारण हा माझा पिंड नाही. मी लिहू शकतो आणि हेच माझे काम आहे. मला लिखाणाने क्रांती आणायची आहे, अशी त्यांची भूमिका आहे. देश-परदेशांत त्यांची सतत व्याख्याने होतात; तसेच सोशल मीडियावर ॲक्‍टिव्ह आहेत. इंग्रजी साहित्याची रुची असणाऱ्या युवा वर्गाचे ते आयकॉन आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्यास प्रत्येक जण इच्छुक असतो.

आता ही दुर्मीळ संधी ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘एज्युकेशन एक्‍सो’निमित्त पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थी युवा वर्गाला उपलब्ध करून दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com