यवतला दगडफेकीत 4 पोलिस जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

केडगाव/यवत - यवत पोलिसात फिर्याद देण्यासाठी आलेल्या दोन गटातील लोकांनी एका अधिका-यासह चार पोलिसांवर पोलिस स्थानकात हल्ला केला. पोलिस स्थानकाच्या आवारात दोन गटात हाणामारी होत असताना या जमावास पोलिस वेगळे करीत होते. त्याचवेळी जमावाने पोलिसांना लक्ष्य केले. यात एकाने पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या डोळ्यावर दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले. अन्य तीन पोलिसांना जमावाने मारहाण केली. हा प्रकार गुरूवारी मध्यरात्री यवत येथे घडला. या हाणामारीमुळे पोलिसांनी 30 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सात जणांना अटक करण्यात आली असून आरोपी धायगुडेवाडी ( ता.दौंड ), फुरसुंगी, दौंड येथील आहेत.  

संशयित आरोपींची नावे या प्रमाणे मुन्ना उर्फ संजय राजेश लोंढे, पदमिनी आबा कसबे, फुलाबाई राजू लोंढे, विकास वसंत राखपसरे, बाळासाहेब सुरेश राखपसरे, वसंत भाऊसाहेब राखपसरे, संगिता वसंत राखपसरे, अवि सुरेश राखपसरे (सर्व रा. फुरसुंगी ता. हवेली जि. पुणे), सतीश आबा कसबे, छगन मारुती भाले, सोमनाथ राजेंद्र कसबे, नाना उर्फ बाळासाहेब नारायण लोंढे, विठ्ठल राजेश लोंढे, माणिक शिवाजी भाले, प्रमोद दादा अवचट, सचिन राजेश लोंढे (सर्व रा. धायगुडेवाडी ता. दौंड ) व इतर अनोळखी 8 ते 10 जण नाव, पत्ता माहीत नाही. याशिवाय इनोव्हा मोटारीतील इक्बाल मुबारक शेख, इम्रान शेख, ( दोघे रा. खाटीक गल्ली, दौंड ) व त्यांचे अन्य दोन साथीदार नाव पत्ता माहित नाही. आरोपींवर दंगल घडविणे, गंभीर दुखापत करणे, शासकीय कामात अडथळा आणणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

गुरूवारी रात्री ऩऊ वाजण्याच्या सुमारास चौफुला - धायगुडेवाडी मधील गारूडगल्लीत राहणा-या महिलांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणे झाली. या भांडणात घरातील पुरूष मंडळी पडली. यात एका पुरूषाने एका महिलेला मारल्याने तेथे दोन गटात तुफान दगडफेकीने हाणामारी झाली. दगडफेकीमुळे भांडणे सोडवायला गेलेली स्थानिक मंडळी पळून गेली. घटनेची माहिती मिळाल्याने यवत पोलिस घटनास्थळी गेले व त्यांनी जमावाला शांत केले. त्यानंतर तक्रार देण्यासाठी दोन्ही गटाचे लोक यवत पोलिस स्थानकात जमा झाले. दोन्ही फिर्यादींनी दौंड व फुरसुंगी येथून भाडोत्री गुंडांना यवत येथे बोलविल्याने मध्यरात्री पोलिस स्थानकात परिस्थिती तणावपुर्ण बनली. 

या जमावात परस्परांमध्ये दगड, काठया, हाताने, लाथा बुक्क्यांनी हाणामारी सुरू झाली. पोलिसांसमोर हा प्रकार घडत असल्याने पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला. तेव्हा मुन्ना लोंढे याच्या बरोबर आलेल्या एकाने पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या दिशेने दगड भिरकावला. हा दगड बंडगर यांच्या डाव्या डोळ्याच्यावरच्या भागाला लागला. या जखमेत सात टाके पडून बंडगर यांचा डोळा सुजला आहे. याच वेळी महिला पोलिस कर्मचारी स्नेहल गायकवाड व मुत्ताप्पा संकुल, हवलदार बापूराव बंडगर यांनाही जमावाने मारहाण केली. यात हे तीघेही किरकोळ जखमी आहेत. सूरज बंडगर यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी गणेश मोरे यांनी यवतला भेट देऊन बंडगर यांची विचारपूस केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनायक दरेकर करीत आहे. 

Web Title: Youth injured in police raid