पुणे : औंधमध्ये तलवारीने वार करून तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

रफीक शेख (वय 27, रा. औंध) असे मृत तरुणाचे नाव आहे. शेख याचा खून कशामुळे झाला, आरोपीचा मयत तरुणाशी काय संबंध होता, याबाबतचा तपास चतु:शृंगी पोलिस करीत आहेत.

पुणे : औंध परिसरामध्ये शुक्रवारी मध्यरात्री एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने तलवारीने वार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता. नागरीकांनी त्यास उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

रफीक शेख (वय 27, रा. औंध) असे मृत तरुणाचे नाव आहे. शेख याचा खून कशामुळे झाला, आरोपीचा मयत तरुणाशी काय संबंध होता, याबाबतचा तपास चतु:शृंगी पोलिस करीत आहेत.

दरम्यान आरोपीचा शोध घेण्याचे काम ही पोलिसांकडुन सुरु करण्यात आले आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth killed in aundh area Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: