मंचरच्या तरुणांनी 2135 फुट उंच गडावर फडकवला तिरंगा ध्वज

आंबेगाव तालुक्यातील तरुणांनी पहाटे मुसळधार पाऊसात गोरखगड सर केला.
Indian Flag
Indian Flag Sakal

मंचर : आंबेगाव तालुक्यातील तरुणांनी पहाटेच्या वेळी मुसळधार पाऊसात गोरखगड (म्हसे ता.मुरबाड जि.ठाणे) सर करून तब्बल २ हजार १३५ फूट उंचीवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा ध्वज फडकवत जल्लोष साजरा केला.

म्हसा या गावाजवळ असलेले मच्छिंद्रगड व गोरखगड हे जोडकिल्ले आहेत. गोरखगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली होती. असा इतिहास सर्वश्रुत आहे. मंचर येथील पर्यटक किरण थोरात, रवी लोखंडे, मंगेश दैने, निखिल थोरात, अतुल थोरात इतर सहकारी पर्यटकांनी श्री क्षेत्र भीमाशंकर अभयारण्यातून रात्रभर प्रवास केला.

“निसरडी पाउल वाट व काळोख्या रात्रेत एकमेकांना आधार व धीर देत भरपावसात मार्ग काढत गोरखगडावर तिरंगा ध्वज फडकवला. “भारत माता की जय”, “वंदे मातरम” घोषणा देत स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. देशभक्तीपर गीते गायली. हा जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.” असे रवी लोखंडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com