भिवरीत युवकाचा दगडाने ठेचून खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सासवड - भिवरी (ता. पुरंदर) येथील संतोष साधू दळवी (वय ३७) या युवकाचा पूर्ववैमनस्यातून मंगळवारी (ता. ३१ जुलै) रात्री दगडाने मारहाण करीत गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून करण्यात आला. याप्रकरणी दहा संशयित आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला असून, त्यातील चौघांना पोलसांनी ताब्यात 
घेतले आहे.   

दादासाहेब सुरेश कटके, दत्तात्रेय सुरेश कटके, भरत रामभाऊ कटके, हेमंत रमेश गायकवाड, अक्षय बाळकृष्ण गायकवाड, मयूर बोराडे, दीपक भंडलकर, आदेश शिवाजी पवार, मोहन लक्ष्मण गायकवाड, बाळू लक्ष्मण गायकवाड (सर्व रा. भिवरी, ता. पुरंदर) अशी त्यांची नावे आहे. 

याबाबत साधू दळवी (वय ६०) यांनी फिर्याद दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सासवडचे पोलिस निरिक्षक मुगुटराव पाटील यांनी दिली.  

याबाबत हकीकत अशी - संतोष दळवी व संशयित आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. त्यावरून काल रात्री प्रमुख आरोपींनी संतोष व त्याच्या वडिलांना बाहेर बोलवून घेतले. पुन्हा भांडणे उकरून काढूत दादासाहेब कटके, भरत गायकवाड, हेमंत गायकवाड यांनी गावठी कट्टा संतोषवर रोखून धरला. तसेच त्यास हाताने, लाथा बुक्‍क्‍यांनी व दगडांनी मारहाण केली. त्याच्या डोक्‍यात दीपक, मयूर, अक्षय, आदेश यांनी तोंडावर व डोक्‍यात दगड टाकले आणि जखमी केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला, असे फिर्यादित म्हटले आहे, अशी माहिती फौजदार एस. एस. गोसावी यांनी दिली.

Web Title: youth murder in bhivari crime

टॅग्स