बेपत्ता झालेल्या तरुणाचा शेलपिंपळगावात खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

चाकण - शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे एका तरुणाचा खून केलेला मृतदेह मंगळवारी (ता. २२) दुपारी पावणेतीनच्या सुमारास आढळला. जितेंद्र मदनलाल सागर (वय ३५, सध्या रा. मोहितेवाडी, ता. खेड; मूळ रा. बेलनगंज, आग्रा, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी खूनप्रकरणी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली.

जितेंद्र सागर याचा मृतदेह भीमा नदीच्या पात्राजवळील रस्त्यावर पडलेला होता. येणाऱ्या- जाणाऱ्यांनी हा मृतदेह पाहिला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी सायंकाळी गेले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या तरुणाच्या छातीवर, पोटावर धारदार हत्याराने वार करून कोणी तरी अज्ञाताने खून केला आहे. पोलिसांना या मृतदेहाची ओळख पटली नाही. 

रात्री हा मृतदेह बाळू पोतले यांनी ओळखला. हा मृतदेह पोतले यांनी त्यांच्या जावयाचा असल्याचे सांगितले. त्यांचा जावई दोन दिवसांपासून बेपत्ता होता. सागर हा एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याच्या मागे पत्नी आहे. त्याने शेलपिंपळगाव येथील मुलीशी प्रेमविवाह केला होता.

Web Title: youth murder crime