पुणे: दौंडजवळ युवकाची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

आखाड पार्टीनिमीत्त स्वप्निल शेलार यांच्या घरी जेवणावळीने आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी जवळच्या व्यक्तिला मटणाचा डबा देण्यासाठी मयत स्वप्निल हे दुचाकीवरुन घरापासुन अंदाजे 200 मीटर अंतरावरील एकेरीवाडी -देलवडी रस्त्यावर नारायण शेलार यांच्या घरासमोर आले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तिंनी स्वप्निलवर धारदार शस्त्राने वार करून हल्ला केला.

राहू : देलवडी (ता. दौंड)  येथे वाळू व्यवसाय व गुंडगिरीच्या वादातून स्वप्निल ज्ञानदेव शेलार (वय 28, राहणार देलवडी ता. दौंड) याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

आखाड पार्टीनिमीत्त स्वप्निल शेलार यांच्या घरी जेवणावळीने आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी जवळच्या व्यक्तिला मटणाचा डबा देण्यासाठी मयत स्वप्निल हे दुचाकीवरुन घरापासुन अंदाजे 200 मीटर अंतरावरील एकेरीवाडी -देलवडी रस्त्यावर नारायण शेलार यांच्या घरासमोर आले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तिंनी स्वप्निलवर धारदार शस्त्राने वार करून हल्ला केला. तसेच डोक्यामध्ये मोठ्या दगडाने आणि धारदार शस्त्राने घाव घातला. यामध्ये डोक्याचा चेंदामेंदा झाला. नंतर यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी घटनास्थळी एक गावठी कट्टा सापडला.

यासंदर्भात मयत स्वप्निल याचा भाऊ विशाल शेलार यांनी यवत पोलिसांना तक्रार दिली आहे. संशयित आरोपी म्हणुन काही संशयित आरोपीची नावे राहू गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष संपत जगताप, समीर संपत जगताप, रा. राहू (ता. दौंड) बाबू मेमाणे, रणजित वांझरे, सोमनाथ विष्णूपंत शेलार रा. देलवडी (ता. दौंड) अनिल मोहिते (रा. पिंपरी चिंचवड, दीपक दंडवते रा. शिक्रापूर) यांची नावे फिर्यादीत दाखल करण्यात आली आहेत.

Web Title: youth murder in Daund Pune