शिवण्यातील तरुणाचा पानशेतला खून 

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 9 जुलै 2018

खडकवासला - तीन मित्रांनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवुन योगेश हरीभाऊ ढोणे (रा.शिवणे ता. हवेली) यास दारु पाजली. नंतर त्याचा धरण परीसरात त्याच्या डोक्यात दगड घालुन खून केला. तसेच त्याचा मृतदेह निर्जन व डोंगराळ भागात टाकला होता. हा गुन्हा सिंहगड रस्ता पोलिसांनी १२तासात उघडकीस आणून त्यातील आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी केली आहे. 

खडकवासला - तीन मित्रांनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवुन योगेश हरीभाऊ ढोणे (रा.शिवणे ता. हवेली) यास दारु पाजली. नंतर त्याचा धरण परीसरात त्याच्या डोक्यात दगड घालुन खून केला. तसेच त्याचा मृतदेह निर्जन व डोंगराळ भागात टाकला होता. हा गुन्हा सिंहगड रस्ता पोलिसांनी १२तासात उघडकीस आणून त्यातील आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी केली आहे. 

या प्रकरणी गणेश कवळे, त्याचे मित्र भुषण गायकवाड, मंदार शिंदे यांनी संगणमताने योगेश यास दारु पाजून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याप्रकरणी या  तिघांना अटक करून वेल्हा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  असे पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी ही माहिती दिली. 

ढोणे यास गाडीवर बसवून त्याच्या तीन मित्रांनी त्यास खडकवासला भागात नेवून दारु पाजली. पानशेत जवळील वरसगाव धरण परिसरात त्याचा खून केला होता. योगेश रात्रभर घरी आला नाही. यामुळे तो पालखीस गेला असावा. असे त्याचे नातेवाईकांनी वाटले. त्यामुळे त्याचा शोध घेतला नाही.

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील कर्मचारी संतोष सावंत यांना मिळालेल्या माहितीवरून हा तपास करण्यात आला. याबाबत कोणत्याही पोलीस ठाण्यात त्याची तक्रार देण्यात आलेली नाही. तरी देखील सिंहगडरोड बातमीवरुन पोलीस निरीक्षक सरदार पाटील व पोलीस निरीक्षक संगिता यादव यांच्या मार्गदर्शनाखालीफोउजदर सुधीर घाडगे, पो.ना. देशमुख, पो.ना.कायगुडे, पो.ना. जमदाडे, पो.ना. शिनगारे, पो.शि. किशोर शिंदे, पो.शि. मयुर शिंदे, पो.शि. निलेश कुलथे या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी अगोदर गणेश कवळे या संशयीतास प्रथम ताब्यात घेतले.  त्याने खुनाची कबुली दिली असल्याने पावसात पानशेत धरणाच्या परीसरातील ५ ते ७ कि.मी.चा परीसरात शोध घेवुन वेल्हे तालुक्यातील मोसे येथे डोंगराळ व निर्जन भागात योगेश ढोणे याची मृतदेह शोधुन काढले आहे.

मृतदेह मिळुन येताच सिंहगडरोड पोलीसांनी पुणे ग्रामीण दलातील वेल्हे पोलीस ठाण्यास कळविली. सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलावळ या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाल्या व त्यांनी मृतदेह ताब्यात घेवून खुनाचा गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

Web Title: Youth Murder in Panshet crime