कर्वेनगरमध्ये प्रेम प्रकरणातून युवकाचा खून

कर्वेनगरमध्ये प्रेम प्रकरणातून युवकाचा खून

पुणे - कर्वेनगर परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजता घडली. हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. दरम्यान, या खुनामुळे शहरातील खुनांचे सत्र थांबण्यास तयार नसल्याची सद्यःस्थिती आहे. 

सिद्धप्पा कलबंडी (वय २१, रा. लक्ष्मीनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धप्पा हा लक्ष्मीनगर येथील त्याच्या घराजवळ रात्री नऊच्या सुमारास थांबला होता. त्या वेळी त्याच्याजवळ आलेल्या राहुल सरकार व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने सिद्धाप्पावर वार केले, त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, सिद्धप्पा हा मुलींची छेडछाड करत होता, त्यावरून तीन ते चार जणांनी त्याचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

खुनाचे सत्र थांबेना
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच शहराच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या कारणावरून खुनाचे प्रकार घडत आहेत. त्यामध्ये हडपसर, वारजे, सिंहगड रस्ता परिसरात हे गुन्हे घडले आहेत. रविवारी भरदिवसा सिंहगड रस्त्यावर एकाचा खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असतानाच सोमवारी रात्री अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com