पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पेट्रोल व डिझेल इंधनवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात आंदोलन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा प्रतीकात्मक पुतळा यावेळी जाळला.

बिबवेवाडी (पुणे) - पेट्रोल व डिझेल इंधनवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात आंदोलन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा प्रतीकात्मक पुतळा यावेळी जाळला. त्याचबरोबर दुचाकी पेटवून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी केंद्रसरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप होता.

Web Title: youth ncp potest against petrol diseal price