स्वच्छतेसाठी तरुणाईचा जागर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

पुणे - संदेश फलकांतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्यातून उलगडलेले स्वच्छतेचे महत्त्व...तरुणांनी एकत्र घेतलेली शपथ अन्‌ ‘स्वच्छ पुण्यासाठी’ दिलेले योगदान...अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘ग्रीन पुणे, क्‍लीन पुणे’चा संदेश पुणेकरांना दिला. सुमारे १२० ठिकाणी पाच हजार तरुण-तरुणींनी एकत्र येऊन ही मोहीम राबवली. या वेळी पाच हजार कचरापेट्यांचे वाटप करण्यात आले.

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे (जेएसपीएम) नऱ्हे कॅम्पस, द शेतकरी शिक्षण मंडळ आणि ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) तर्फे ‘ग्रीन पुणे, क्‍लीन पुणे’ ही मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत झालेल्या विविध उपक्रमांत तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या मोहिमेची सुरवात महापालिकेचे उपायुक्त सुरेश जगताप यांच्या हस्ते झाली. जेएसपीएमचे संचालक डॉ. आर. एस. जोशी, डॉ. पी. पी. विटकर, रवी सावंत, प्रा. एस. आर. थिटे, आर. टी. सावंत, प्राचार्य डॉ. डी. एस. बिलिगी, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, ‘यिन महाराष्ट्र’चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी या वेळी उपस्थित होते. या प्रसंगी अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. तर महाविद्यालयीन तरुणाईने स्वच्छतेविषयी पथनाट्य सादर केले.   

पुण्यात खूप कचरा तयार होतो. त्यामुळे कचरा वर्गीकरणाची प्रक्रियाही अवघड आहे. शहर स्वच्छ ठेवण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. अशा वेळी नागरिकांचा सहभागच शहर स्वच्छतेसाठी प्रेरक ठरू शकतो. यात सातत्य असेल, तर नक्कीच बदल घडू शकतो.
- सुरेश जगताप, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
 
आपल्या संस्कृतीत स्वच्छतेला 
मोठे महत्त्व आहे. स्वच्छतेचे भान ठेवून नागरिकांनाही शहर आणि देश स्वच्छ ठेवण्याची जाणीव करून द्यावी. सोशल मीडियावरदेखील याचा प्रचार व्हावा.
- भार्गवी चिरमुले, अभिनेत्री

Web Title: youth publicity for cleaning