पुणे : मदतीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

घरामध्ये आईबरोबर भांडण झाल्यामुळे रागावून घरातून निघून गेलेल्या 19 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने घोरपडी रेल्वे स्थानकाजवळ बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे : घरामध्ये आईबरोबर भांडण झाल्यामुळे रागावून घरातून निघून गेलेल्या 19 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने घोरपडी रेल्वे स्थानकाजवळ बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी रविवार पेठेत राहणाऱ्या तरूणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन 25 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे तिच्या आईसमवेत बुधवारी सायंकाळी भांडण झाले होते. त्यामुळे आईवर रागावून तरुणी घराबाहेर निघून गेली होती. तेथून ती पुणे रेल्वेस्थानकात बंगळुरूकडे जाणाऱ्या एक्‍स्प्रेसमध्ये बसली. दरम्यान, रेल्वे कराडजवळ पोचली, त्यावेळी तिकिट तपासणीसाने तिच्याकडे तिकीटाची मागणी केली, तेव्हा तिकीट नसल्यामुळे तिला कराड रेल्वे स्थानकामध्ये उतरण्यास सांगितले. त्यानंतर तरुणी पॅसेंजर रेल्वेने कराडहून पुन्हा पुण्याला येण्यास निघाली.

बुधवार व गुरूवार दोन दिवस काही खाल्ले नसल्यामुळे तरुणीस चक्कर येऊ लागली. तेव्हा तिला एक युवक भेटला. त्याने तरुणीस रिक्षाने घरी सोडतो असे सांगितले. ते दोघेही घोरपडी रेल्वे स्थानकात उतरले. संबंधित तरुणावर विश्‍वास ठेवून रेल्वेस्थानकाबाहेर नेले. त्यानंतर तेथील एका खोलीमध्ये नेऊन पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरुणीस घोरपडी रिक्षा स्टॅंडवर सोडून तेथून पलायन केले. दरम्यान, घाबरलेल्या अवस्थेतील तरुणीने या प्रकाराबाबत वानवाडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A youth raped on Girl in Pune