राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'अच्छे दिनची गाजर यात्रा'

मिलिंद संधान
शनिवार, 7 एप्रिल 2018

नवी सांगवी (पुणे) : इंधन वाढ, पाणी प्रश्न, स्वच्छता व यासारख्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आय सांगवी पिंपळे गुरव परिसरात 'अच्छे दिनची गाजर यात्रा' काढण्यात आली. येथील साई चौकात दुपारी बाराच्या दरम्यान बैलगाड्यात घरगुती वापराचे सिलेंडर, दुचाकी, पाण्याचे हंडे, बरोजगार पदवीधर तरूण भजी तळतायेत असे चित्र उभे करून ही गाजर यात्रा निघाली. 

पक्षाचे युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक राजु बनसोडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, फजल शेख, शेखऱ काटे, शिवाजी पाडुळे, शाम जगताप, गौरव टण्णू, तानाजी जवळकर, बाळासाहेब पिल्लेवार यांच्यासह इतरही कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोदी सरकार हाय हाय..., मोदी सरकार फेकू सरकार... अशा चौकाचौकात मोदी व फडणवीस सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून मोठ्याने घोषणा दिल्या जात होत्या. साई चौक, कृष्णा चौक, काटेपुरम, काशी विश्वेश्वर प्रशाला, महाराष्ट्र बँक, पिंपळे गुरव गावठाण व त्यानंतर पिंपळे गुरवचा मोठा बस थांब्याजवळ सभा घेऊन मोर्चाचे विसर्जन झाले. 

ऐरवी वातानुकूलीत गाड्या, पंचतारांकीत कार्यालयात बसणारे नेते व कार्यकर्ते भर दुपारच्या रणरणत्या उन्हात मोर्चात सहभागी तर झालेच परंतु मोठमोठ्याने मोदीसरकारच्या विरोधात घोषणाही देत होते. त्यामुळे मोर्चा संपल्यानंतर ' जीव कासावीस होणे ' हा प्रकार काय असतो तो आंम्ही आज अनुभवला अशी प्रतिक्रीया कार्यकर्त्यांनी दिली. 

Web Title: youth rashtravadi rally of acche din gajar yatra