तरुणाई वाचतेय पुस्तकांची सॉफ्टकॉपी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

पुणे - नवीन पुस्तक विकत घेऊन कोऱ्या पानांचा वास घेणं आणि प्रत्येक ओळीवर बोट ठेऊन करकरीत पानं वाचताना पलटणं. हा अनुभव एखादा वाचनवेडा माणूस दिवस-रात्र घेऊ शकतो. जुन्या पिढीतील अनेक माणसं आजही हे करतात. पण काळाच्या ओघात हातातील पुस्तक जाऊन त्या जागी टॅबलेट्‌समधील ई-बुक्‍स आली आहेत किंवा नवीन पुस्तक विकत आणण्यापेक्षा ते ऑनलाईन सॉफ्टकॉपी स्वरूपात खरेदी करण्याला जास्त प्राध्यान्य मिळत आहे.

छपाई आणि पेपर स्वरूपात असलेली प्रत्येक गोष्ट आता सॉफ्टकॉपीत येत आहे. त्यामुळे हे रूपांतर होण्याचा काळ परिवर्तनाचा म्हणावा लागेल. त्यामुळे प्रत्येक छपाईतील गोष्टींचे ऑनलाईन व्हर्जन पाहायला मिळत आहे. या परिवर्तनाच्या काळात पुस्तक घेऊन फिरण्यापेक्षा मोबाईलवर वाचणं जास्त सोयीचं झालं आहे. त्यामुळे पुस्तकांची ऑनलाईन विक्री आणि आवृत्ती यांचे प्रमाण वाढले आहे. २० ते ५० वयोगटांतील व्यक्ती छपाईतील पुस्तकं विकत घेण्यापेक्षा त्याची पीडीएफ, ऑनलाईन व्हर्जन वाचणे किंवा त्याच्या ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देत आहेत. किंडल, स्टोरीटेल, डेलिहंट, ब्लॉग्स यांसारख्या ॲप्समुळे अनेक ब्लॉग्स, कथा ऑडिओ स्वरूपातही सहज पुस्तकं उपलब्ध असतात.

युरोपातील देशांमध्ये पुस्तकांची दुकानं बंद पडली आहेत. भारतात तशी परिस्थिती नाही, परंतु पुढच्या १० ते १५ वर्षांत पुस्तकांची दुकानं, ग्रंथालयं या सर्वांचे रूपांतर ऑनलाईन होण्यास सुरवात नक्कीच होईल.

आदित्य गुंड (ब्लॉगर, वाचक) - मी वाचनासाठी फक्त ऑनलाईन व्हर्जनचा वापर करतो. भविष्यात फक्त ऑनलाईन आवृत्ती उपलब्ध असेल. तसेच ग्रंथालयांचे प्रमाणही कमी होईल. मात्र विद्यापीठं, शाळा, महाविद्यालयातील शैक्षणिक हेतूंसाठी असलेली ग्रंथालये मात्र असतील. परंतु, अवांतर वाचनासाठी ग्रंथालयं, छपाई आवृत्ती यांचे स्वरूप नक्कीच बदलेल.

Web Title: Youth Reading Book Softcopy Online Purchasing Increase