युवकांनी नवनवीन शेतीपुरक व्यवसाय सुरु करावेत : आ. भरणे

राजकुमार थोरात
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

वालचंदनगर (पुणे) : युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन नवनवीन शेती पुरक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले.

वालचंदनगर (पुणे) : युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन नवनवीन शेती पुरक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले.

बेलवाडी (ता.इंदापूर) जवळील पवारमळा येथे सघन कुक्कुट विकास प्रकल्पातंर्गत अंडी उबवणी केंद्राच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.शितलकुमार मुखणे, पुणे जिल्हा परिषदेचे पुशसंवर्धन अधिकारी डॉ.शिवाजी विधाते, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, विद्यमान संचालक सर्जेराव जामदार, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, सचिन सपकळ, विजय पवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लहू वडापुरे, डॉ. संजय शिंदे, दिव्या हॅचरीज अॅन्ड पोल्टी फार्मचे प्रमुख रोहन थोरात उपस्थित होते.

यावेळी भरणे यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कोणत्याही व्यवसाय सुरु केल्यास यश निश्‍चित मिळते. शेतीपुरक व्यवसायामध्ये सध्या युवकांना अनेक संधी उपलब्ध आहेत. युवकांनी संधीचे सोने करणे गरजचे असल्याचे सांगितले. यावेळी भरणे यांच्या हस्ते  अंडी उबवणी केंद्राच्या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले.  यासंदर्भात तालुकापुशसंवर्धन अधिकारी डाॅ. लहु वडापुरे यांनी सांगितले की, सघन कुक्कुट विकास प्रकल्पातंर्गत राज्यामध्ये 302 प्रकल्प सुरु होत अाहेत. पुणे जिल्हामध्ये यातील इंदापूर, शिरुर, खेड, मावळ या तालुक्यात प्रत्येक एक प्रकल्प सुरु होणार आहे. या प्रकल्पातंर्गत  यामुळे कुक्कुटपालनास चालना मिळणार असुन देशी (गावरान) प्रजातीचे कुकटपक्षी वाढण्यास मदत होणार अाहे.

सध्या पुणे येथील अंडी उबवनी केंद्रातुन देशी एकादिवसाचे पिल्ले आणावी लागत होती. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांनी जवळच देशी पिल्ले मिळणार आहेत.या प्रकल्पामध्ये शासन ही भागीदार आहे. देशी प्रजातीच्या कुकटपक्षामुळे  दैनंदिन आहारात प्रथिनयुक्त आहाराचा समावेश होऊन भविष्यात कुपोषणावर मात करणे शक्‍य होणार असुन ग्रामीण भागातील महिला व पुरुषांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

Web Title: youth should try to create supportive farming business said MLA bharne