युवकांनी अवकाश संशोधनाकडे वळावे - किरण कुमार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. चांद्रयान मोहिमेमुळे जगात भारतीयांची पत वाढली आहे. अवकाश क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे असल्याने युवकांनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी केले.

पुणे - भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. चांद्रयान मोहिमेमुळे जगात भारतीयांची पत वाढली आहे. अवकाश क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे असल्याने युवकांनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाचा चौथा वर्धापन श्री ज्ञानेश्‍वर विश्‍व शांती प्रार्थना सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वारंगल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. डॉ. एन. व्ही. रामना राव, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत पाडव, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. विनायक घैसास, मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, कुलसचिव शिवशरण माळी, स्वामी योगी अमरनाथजी, राजनीश सचदेव कौर, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, डॉ. रेणू व्यास, सुबोध देवगावकर, डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. वसंत पवार, कर्नल संजीव गुप्ता, असावरी भावे, डॉ. मिलिंद ढोबळे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth should turn to space research Kiran Kumar