डोंगरावरून उडी मारून युवकाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे : धायरी गावाजवळ असलेल्या डोंगरावरून उडी मारून युवकाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली असली तरी आत्महत्या चार ते पाच दिवसांपूर्वीच झाली असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. दरम्यान, सिंहगड पोलिसांकडून रात्री उशीरापर्यंत मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. 

धायरी गावापासून काही अंतरावर एक डोंगर आहे. या डोंगरावर रविवारी दुपारी काही हौशी छायाचित्रकार छायाचित्रीकरण करण्यासाठी गेले होते, त्या वेळी त्यांना तेथे दुर्गंधी आली. त्यामुळे त्यांनी परिसरात शोध घेतला. त्या वेळी त्याना एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी याबाबत सिंहगड पोलिसांना माहिती दिली.
 
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. त्या वेळी संबंधित युवकाने डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, मृतदेह कुजलेला असल्याने पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. 

सिंहगड परिसरातून बेपत्ता झालेल्या युवकांची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. त्यामध्ये एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेला आणि एका पेपरमध्ये नापास झालेला एक युवक बेपत्ता झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. आत्महत्या केलेला युवक अभियांत्रिकीचा विद्यार्थी असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.  
 
Web Title: Youth suicide by jumping off the hill