पिंपरी: 'आयटी'त काम करणाऱ्या तरुणाची गोळी झाडून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

सचिन शिवाजी वांडेकर (वय २८, मूळ राहणार-आष्टी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.  सचिनकडे पिस्तुल आले कोठून हा देखील गंभीर प्रश्न आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलिस करीत आहेत.

पिंपरी चिंचवड : पिस्तूलातून छातीत गोळी झाडून आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. ही घटना रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

सचिन शिवाजी वांडेकर (वय २८, मूळ राहणार-आष्टी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.  सचिनकडे पिस्तुल आले कोठून हा देखील गंभीर प्रश्न आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलिस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सचिन, लहान भाऊ दीपक शिवाजी वांडेकर आणि विशाल अशोक लहाने हे तिघे जण एकत्र रुमवर पिंपळे गुरव येथे राहत होते. रविवारी सायंकाळी विशाल हा बाथरूममध्ये होता, तर लहान भाऊ दीपक हा जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली जात होता. तेवढ्यात, गोळी झाडल्याचा आवाज आला. जिन्याच्या पायऱ्या उतरत असणारा भाऊ धावत वर आला तर विशाल हा देखील बाथरूमधून धावत बाहेर आला समक्ष पाहिल्यानंतर सचिनने पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती. रक्ताच्या थारोळ्यात सचिन पडलेला दिसला. काय करावे हे सुचत नव्हते अखेर कामठे नावाच्या मित्राला बोलवून गंभीर जखमी असलेल्या सचिनला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, परंतु त्याचा उपचारापूर्वीच पर्यंत मृत्यू झाला होता.

दरम्यान, सचिन हा पुण्याच्या विमान नगर येथील आयटी कंपनीत कामाला होता. त्याने तीन दिवसांपूर्वीच नोकरी सोडली होती असे पोलिस तपासात समोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे उच्चशिक्षित सचिनकडे पिस्तुल आले कोठून हा प्रश्न अनुउत्तरीत असून त्याचा तपास सांगवी पोलिस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth suicide in Pimple Gurav area pimpri