मोबाईलच्या व्यसनावर 'आनंदवन'चा आधार

मोबाईलच्या व्यसनावर 'आनंदवन'चा आधार

पुणे : मोबाईल आणि त्यावर सहज हाताळले जाणारे इंटरनेट या दोघांच्याही अतिपवापराचं रुपांतर व्यसनात कधी होतं हे बहुतेकांना कळतही नाही. दारु, तंबाखू, चरस यापेक्षा घातक ठरणाऱ्या या व्यसनामध्ये अनेकांचे जीव गेल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. वेळीच या व्यसनावर मात करण्यासाठी आता चक्क तरुणवर्ग व्यसनमुक्ती केंद्राचा आधार घेताना दिसत आहेत. 

'आनंदवन' या  संस्थेकडून  ई-व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. सध्या 60 ते 65 रुग्ण या व्यसनमुक्तीसाठी उपचार घेत आहेत. मोबाईल ही सुविधा आहे. त्याचं व्यसनात रूपांतर होणं कधीही धोकादायक आहे. आज आपण बघतो की अनेक घरांमध्ये दर माणशी मोबाईल आहे. अर्थात मोबाईलच्या वापरात तरुणवर्ग आघाडीवर आहे. त्यांना मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळणे, गाणी ऐकणे, मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारणे, सोशल मीडियाचा वापर करणे यासाठी हवा असतो. मात्र, कालांतराने मोबाईलचा अतिवापर व्यसनात रुपांतरित होतो. हे व्यसन दूर करण्यसाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रात तब्बल चारशेहून अधिक काॅल येतात. सध्या 60 ते 65 मुलांवर उपचार सुरु आहे. प्रथम त्या रुग्णाची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेऊन ई-व्यसनमुक्ती थेरपी सुरू होते.

बाकी कुठल्या सोयीसुविधा नसतील तरी चालेल मात्र, हातात मोबाईल हवाच असं मत तरुणाईचे झाले आहे. कुटुंबातील सगळी माणसे एकत्र असतानाही त्यांच्यामध्ये संवाद घडत नाही. आपापल्या मोबाईलमधील इंटरनेटवर वेळ घालवण्यात प्रत्येकजण व्यस्त असतो.  या विळख्यात अडकलेल्या दोन तरुणांनी आपल्या मोबाईल व्यसनाबाबत अनुभव सांगितला. त्यांना मोबाईलचे व्यसन कसे जडले आणि नंतर ते यातून कसे बाहेर पडले हे सांगितले. अत्यंत बोलका आणि अनेकांशी निगडीत असलेल्या या अनुभवावरुन इतरांनी बोध घेण्याची गरज आहे.

आपल्याला मोबाईलची इतकी सवय झालेली आहे की, आज आपण मोबाईलशिवाय राहूच शकत नाही. प्रत्येक पाच मिनिटांनंतर आज आपले लक्ष आपल्या मोबाईलकडे जाते. याचाच अर्थ आपल्याला त्या मोबाईलचे व्यसन लागले आहे. त्यामुळे वेळीच या व्यसनापासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. नाहीतर ई-व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्ती करणाऱ्यांची संख्या वाढतच जाईल यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com