'युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच, त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले. 

आफळे अकादमीतर्फे कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात गोखले बोलत होते. याप्रसंगी निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार गोखले यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. या वेळी कीर्तनकार चारुदत्त आफळे, डॉ. मिलिंद भोई उपस्थित होते. 

गोखले पुढे म्हणाले, ""गुलामगिरी ही फक्त शारीरिक नसते, तर ती मानसिकही असते. सर्जिकल स्ट्राइकने आपली मानसिकता बदलण्यासाठी मदत होणार आहे.'' 

निंभोरकर म्हणाले, ""भारतीय सेना मोहिमेवर असताना कायमस्वरूपी महिलांचा सन्मान करत आली आहे. हा आपल्या समृद्ध भारताच्या शिक्षणाचा संस्कार आहे.'' या वेळी कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे सर्जिकल स्ट्राइक या विषयावर कीर्तन झाले.

Web Title: The youth will have to motivate the country says Retired Air Marshal Bhushan Gokhale