खेड घाटात पडलेल्या तरुणास जीवदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात वळणावर चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीसह चालक १५० फूट दरीत कोसळला. यामध्ये जखमी झालेल्या योगेश किसन घोमाल (वय २२, रा. लिंगदेव ता. अकोले जि. नगर) या तरुणाला दोराच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. जुन्नर, मंचर व पेठ परिसरांतील ११ तरुणांनी त्यासाठी प्रयत्न केले.

मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात वळणावर चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीसह चालक १५० फूट दरीत कोसळला. यामध्ये जखमी झालेल्या योगेश किसन घोमाल (वय २२, रा. लिंगदेव ता. अकोले जि. नगर) या तरुणाला दोराच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. जुन्नर, मंचर व पेठ परिसरांतील ११ तरुणांनी त्यासाठी प्रयत्न केले.

शुक्रवारी (ता. १९) संध्याकाळी ही घटना घडली. राजगुरुनगरहून खेड घाट चढून घोमाल प्लॅटिना गाडीने मंचरच्या दिशेला येत होता. वळणावर एका चारचाकी वाहनाची धडक बसल्याने दुचाकी कठड्यावरून खोल दरीत कोसळली. दरी ३०० फूट खोल आहे. झाडांना मोटारसायकल अडकली. 

हा अपघात पाहून जुन्नर येथील ॲड. नवनाथ बाळसराफ व अय्युब शेख, बाळासाहेब बालसारफ यांनी सुरवातीला प्रयत्न केले. त्यानंतर गो ग्रीन संस्थेचे प्रशांत भालेकर, मयूर चव्हाण, नरेंद्र शिंदे, शफी हैदर सय्यद (मंचर), पंढरीनाथ धुमाळ, समीर एरंडे, सौरभ कवडे, अक्षय अमंडकर (पेठ) या युवकांनी दोराच्या साह्याने प्रथम योगेश घोमाल याला बाहेर काढले. त्याच्या पायाला थोड्या जखमा झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Yogesh Ghomal Life Saving