माझ्या आईच्या मोबाइलवर मेसेज का टाकता? विचारताच मुलास मारहाण 

संदीप घिसे 
सोमवार, 21 जानेवारी 2019

पंडीत शिंदे, प्रमोद शिंदे आणि विनोद शिंदे (सर्व रा, दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका महिलेने रविवारी (ता.२०) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पिंपरी (पुणे) : माझ्या आईच्या मोबाईलवर मेसेज का टाकता, अशी विचारणा करणाऱ्या मुलास घरात घुसून तिघांनी मारहाण केली. तसेच त्याच्या आईचाही विनयभंग केला. ही घटना दिघी येथे घडली.

पंडीत शिंदे, प्रमोद शिंदे आणि विनोद शिंदे (सर्व रा, दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका महिलेने रविवारी (ता.२०) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी फिर्यादी यांच्या मुलाने आरोपी पंडित शिंदे याला 'माझ्या आईच्या मोबाइलवर मेसेज का टाकता,' अशी सर्वांसमक्ष विचारणा केली. या कारणावरून चिडलेल्या आरोपी पंडित याने आपल्या साथीदारांसोबत फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन त्यांच्या मुलास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याला सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या आईचा आरोपीने विनयभंग केला. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: youths beaten boy in Pimpri